भारतात लॉन्च झाला हुवाईचा पी९ स्मार्टफोन

huwai
नवी दिल्ली – भारतात नुकताच हुवाई या कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन पी९ हा लॉन्च करण्यात आला असून या स्मार्टफोनची किंमत भारतात ३९ हजार ९९९ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल लेंस कॅमेरा देण्यात आला आहे. फोटोग्राफीची आवड असणा-यांसाठी हा स्मार्टफोन चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. जर्मनीच्या १०२ वर्ष जुन्या लिका या कंपनीच्या सहयोगाने या स्मार्टफोनचा कॅमेरा बनवण्यात आला आहे. कॅमेरा बनवण्यासाठी लिका ही लोकप्रिय कंपनी आहे.
हा फोन याच्या कॅमे-यामुळेच बाजारात धुमाकूळ घालणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एवढेच नाहीतर बाकीच्या स्मार्टफोनपेक्षा अनेक नव्या गोष्टी यात असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळे आपण मोनोक्रॉम आणि कलर इमेजला सेप्रेट कॅप्चर करू शकतो. इतर स्मार्टफोनपेक्षा हा स्मार्टफोन जास्त ब्राईट फोटोज काढू शकतो.

यासोबतच या स्मार्टफोनला ५.२ एचडी फुल डिस्प्ले देण्यात आला आहे. Android 6.0 ऑपरेटींग सिस्टीम आहे. शिवाय ८ मेगापिक्सला फ्रंट कॅमेरा आहे. तर 3000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment