दुसर्‍या टर्मसाठी तयार होतो- रघुराम राजन

raghu
रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदावरून पुढच्या महिन्यात पायउतार होत असतानाच गर्व्हनर रघुराम राजन यांनी आपण गर्व्हनरपदाच्या दुसर्‍या टर्मसाठी तयार होतो असे स्पष्ट केले आहे. रघुराम राजन यांना दुसरी टर्म मिळावी की नाही यावरून बराच काळ चर्चा सुरू होती व अखेर राजन यांनी दुसरी टर्म नको असे स्पष्ट केले होते. मात्र त्यामागे राजन यांच्यावर भाजप नेत्यांकडून केली गेलेली जहरी टीका कारणीभूत होती असे राजन म्हणाले.

दुसरी टर्म मिळाली असती तर अनेक अपूर्ण कामे पूर्ण करता आली असती असे सांगून राजन म्हणाले माझ्यावर जे राजकीय आरोप केले गेले ते नक्कीच खालच्या पातळीवरचे होते. सरकारशी चर्चेची प्रक्रिया कोणत्याही निर्णायक पातळीवर गेली नाही. माझ्यावर देशप्रेमासंदर्भात केलेले आरेाप तर हीन होते व त्यामुळेच मी त्याकडे लक्ष दिले नाही. मला दोष देण्याची एकही संधी टीकाकारांनी सोडली नाही पण त्याला कोणताच ठोस आधार नव्हता व त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याचे मला कारण नव्हते. देशहितासाठी जे करता येणे शक्य होते ते सर्व करण्याचा मी प्रयत्न केला.

Leave a Comment