अजिंठा वेरूळ लेण्यांजवळ वसणार जपानी खेडे

ajanta
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या जगप्रसिद्ध अजजिंठा वेरूळ लेण्यांजवळ पारंपारिक पद्धतीचे जपानी गांव वसविले जाणार असल्याचे समजते. महाराष्ट्र सरकार व जपानची वाकायामा यांनी परस्पर सहकार्यातून ही योजना आखली आहे. असे गांव वसविण्याचा प्रस्ताव जपानकडूनच आला आहे. दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ व्हावेत व जपानी पर्यटक मोठ्या संख्येने येथे यावेत असा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ या संदर्भात म्हणाले की या लेण्यांच्या जीर्णद्धारासाठी जपानची आंतरराष्ट्रीय सहयोग संस्था डब्ल्यूपीजी सहाय्य करत आहे. त्यासाठी जपान सरकारकडून अनुदानही दिले जात आहे. भारत आणि जपान हे दोन देश बौद्ध धर्मामुळे शेकडो वर्षांपासून एकमेकांशी जोडले गेले आहेत. अजिंठा वेरूळ येथील लेणी बौद्ध लेणी म्हणूनच ओळखली जातात. येथे जपानी पर्यटकही मोठ्या संख्येने यावेत असा प्रयत्न असून त्यांना आकर्षित करण्यासाठी जपानी गांवाची योजना तयार केली गेली आहे. या योजनेवर स्वाक्षर्‍याही झाल्या आहेत.

Leave a Comment