गूगलची भारतीय मुलीला ४० लाखांची ऑफर

vanya-jual
मोहाली : सर्च इंजिन गूगलने भारताच्या एका कन्येला तब्बल ४० लाखांचे पॅकेज ऑफर केले आहे. या तरुणीचे नाव वान्या जुहाल असे आहे. गूगलच्या सिडनीच्या ऑफिससाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून वान्याची निवड झाली आहे. मोहालीमध्ये सेक्टर ६९ मधील शेमरॉक सीनियर सेकंडरी शाळेत वान्याचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर तिने २०१६ मध्ये आयआयटी हैदराबादहून प्रोफेशनल डिग्री मिळवली. आयआयटीमध्ये शिकत असतानाच गूगलने वान्याची निवड प्लेसमेंट दरम्यान केली होती. आज ४० लाखांचे पॅकेज घेताना आपण खूप आनंदात असल्याचे वान्याने म्हटले आहे. वान्या हिची आई एक पत्रकार आहे तर तिचे वडील सेनेत कर्नल पदावर कार्यरत आहेत.

Leave a Comment