वस्त्रोद्योग क्षेत्रात चीन करणार ६०० कोटीची गुंतवणूक

china
नवी दिल्ली – चीनमधील एका कंपनीने उत्तराखंडमधील वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उधम सिंह नगर येथे ३५ एकर जमीनीवर वस्त्रोद्योग पार्क उभारण्यात येईल. या नव्या पार्कमुळे राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रात विकास होईल असे सरकारचे मत आहे. या नव्या प्रकल्पामुळे साधारण ८ हजार लोकांना रोजगार प्राप्त होईल असे सरकारला वाटते. भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्रात प्रथमच १०० टक्के एफडीआय करण्यात येईल असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले. भारतात गुंतवणूक करण्यात आल्याने भारताव्यतिरिक्त नेपाळ आणि चीनमधील या क्षेत्राला याचा फायदा होईल.

Leave a Comment