सॅमसंगचा आय स्कॅनरवाला गॅलक्सी नोट ७ लॉन्च

samsuing
नवी दिल्लीः बहुप्रतिक्षीत गॅलक्सी नोट ७ हा स्मार्टफोन सॅमसंगने भारतात लॉन्च केला आहे. गॅलक्सी सिरीजमधला हा स्मार्टफोन आतापर्यंतचा सर्वात स्टायलिश असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये आय स्कॅनर असून डोळ्यांनी फोन उचलता येणार आहे.

गॅलक्सी नोट ७मध्ये नोट ५ आणि s७ एज या फोनमधील अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. नोट ७ चार देशांमध्ये १९ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. चीनमध्ये या फोनची आजपासून प्री ऑर्डर घेतली जाणार आहे. चीनमध्ये या फोनची किंमत जवळपास ३५ हजार रुपये असणार आहे. भारतात हा फोन ११ ऑगस्टला येईल, असा अंदाज लावला जात आहे.

Leave a Comment