भारतीय बाजारात दाखल झाला लेनोवोचा व्हाइब के ५ नोट

lenevo
नवी दिल्ली – लेनोवो कंपनीने भारतीय बाजारात ४ जीबी रॅमवाला व्हाइब के ५ नोट हा स्मार्टफोन दाखल केला. ब्लॅक, ग्रे आणि गोल्ड अशा तीन रंगात उपलब्ध असणा-या या फोनची किंमत १३४९९ रुपये असून ३जीबी रॅम असणा-या फोनची किंमत ११,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिन्ट स्कॅनर असून डॉब्ली ऍटमॉस स्पीकर्स आहेत. ५.५ इंच फुल एचडी डिस्प्ले असणा-या या फोनमध्ये व्हीआरचा वापर करण्यासाठी थिएटरमॅक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यात मीडियाटेक हेलिओ पी १०चा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. याचा रिअर कॅमेरा १३ मेगाफिक्सलचा तर फ्रन्ट कॅमेरा ८ मेगाफिक्सलचा आहे. यात ३२ जीबीची इंटरनल स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे.

Leave a Comment