गुगलचे नवे ऑफिस की टेंट सिटी?

google
गुगलने कॅलिफोनिर्यातील माऊंटन व्हॅलीत उभारण्यात येत असलेल्या त्यांच्या नव्या मुख्यालयाचे फोटो जारी केले आहेत. हे कार्यालय कार्यालय न वाटता एखाद्या टेंट सिटीसारखे दिसत आहे आणि हेच याचे वैशिष्ठ मानले जात आहे. वास्तविक या भागात गुगलचे नवे कार्यालय २.२ दशलक्ष चौरस फूट परिसरात उभारले जाणार होते मात्र त्यातील निम्मी जागा त्यांना लिक्ड कंपनीला द्यावी लागल्याने या कार्यालयाचे डिझाईन नव्याने बनविले गेले. आता हे कार्यालय ६ लाख चौरस फूट जागेत असून त्याचे डिझाईन थॉमस अलेक्झांडर यांनी केले आहे. कार्यालयाचा नकाशा मंजूरीसाठी पाठविला गेला आहे.

या नव्या कार्यायात ४५ हजार चौरस फूट ऑफिस इंटिरियर असून १८५०० चौ.फटांचे गार्डन व सार्वजनिक रस्ता आहे. प्रशस्त पार्किंग आहेच शिवाय कर्मचाऱ्यांना आराम मिळवा याची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे. त्यासाठी प्रशस्त कँटीन, विश्रांतीसाठी खोल्या, गोल्फ कोर्ट, प्ले ग्राऊंड, स्विमिंग पूल, जिम, सायकलींग ट्रॅक अशा सुविधा दिल्या गेल्या आहेत. इमारतीचे डिझाईन कॅनोपी सारखे म्हणजे साधारण तंबूसारखे आहे व त्यामुळे हवामान नियंत्रणास मदत होत असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment