मारुतीच्या कार महागल्या!

maruti
नवी दिल्लीः कार उत्पादक मारुकी सुझुकी कंपनीने आपल्या काही कारच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली असून यामध्ये गाड्यांच्या किंमती १५०० रुपयांपासून ते ५ हजारांपर्यंत वाढ केल्यामुळे यापुढे मारुतीच्या कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या खिशाला अतिरिक्त कात्री लागणार आहे. १ ऑगस्टपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

२० हजारांची वाढ मारुतीच्या व्हिटारा ब्रेझा कारच्या किंमतीत करण्यात आली आहे. बलोनोच्या किंमतीत १० हजारांची वाढ केली आहे. कंपनीने फॉरेक्स मूव्हमेंट आणि ग्राहकांची सेगमेंट वाईज मागणी हे महागाई वाढवण्यामागचे कारण सांगितले आहे. मार्च २०१६ मध्ये एका ऑटो एक्स्पोमध्ये व्हिटारा ब्रेझा ६ लाख ९९ हजार रुपये किंमतीसह लाँच केली होती. तर बलोनोची लाँचिंग प्राईस ४ लाख ९९ हजार रुपये होती. मारुतीने या अगोदरही केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर सेस’साठी गाड्यांच्या किंमतीत जवळपास ३४ हजार ४९४ रुपयांपर्यंत वाढ केली होती.

Leave a Comment