अमेझॉनचे प्राइम सब्सक्रिप्शन भारतात लाँच

amazon
मुंबई: आपले प्राइम सब्सक्रिप्शन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉनने भारतात लाँच केले आहे. अमेझॉन प्राइमसाठी यूजर्स अमेझॉन इंडियाची वेबसाइट साइन अप करु शकतात. जर तुम्ही आता साइन अप केले तर यूर्जसला ६० दिवसांपर्यंत मोफत ट्रायल मिळेल. त्यानंतर ही सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला दरवर्षासाठी ४९९रु. द्यावे लागतील. तसे भारतात यासाठी ९९९रु. शुल्क दरवर्षी आहे. मात्र, लाँच किंमत कधीपर्यंत वैध आहे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

अमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शनवर भारतात मिळणाऱ्या सेवेबाबत तुम्ही थोडे निराश होऊ शकतात. सध्या प्राइम सब्सक्रिप्शनसोबत यूजर्सला अनलिमिटेड एक दिवस किंवा दोन दिवस डिलिव्हरी ऑफर मिळेल. याशिवाय अमेझॉनवरील काही ऑफर सगळ्यात आधी प्राइम सब्सक्रिप्शन यूजर्सला उपलब्ध करुन दिली जाईल. अमेरिकेच्या प्राइम यूजर्सला दिेल्या जाणाऱ्या अमेझॉन व्हिडिओ आणि अमेझॉन म्युझिक सेवाही भारतात सध्या देण्यात आलेल्या नाही. दरम्यान, अमेझॉन व्हिडिओ ही सेवा भारतात लवकरच लाँच करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. प्राइम यूजर्सला प्रत्येक प्रोडक्टची मोफत डिलिव्हरी मिळणार नाही. ही ऑफर फक्त प्राइम चेकमार्कसाठी असणार आहे. अमेझॉन प्राइम सेवेचा फायदा देशभरातील २० शहरामध्ये घेता येणार आहे.

Leave a Comment