अॅपल कर्मचार्‍यांच्या कामातून मिळविते अब्जावधींचा महसूल

apple
कोणतीही कंपनी अथवा सरकारी, खासगी संस्था कर्मचार्‍यांना किती वेतन देते याची चर्चा नेहमीच होत असते मात्र या संस्था त्यांच्याकडे काम करत असलेल्या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून कितीची कमाई करत असतात याची फारशी चर्चा केली जात नाही. बिझिनेस इनसायडर या संस्थेने या संदर्भात केलेल्या पाहणीत कर्मचार्‍यांकडून होणार्‍यां कमाईत अॅपल अव्वल क्रमांकावर आहे. सर्वाधिक कॅश सांभाळणारी अॅपल तिच्या प्रत्येक कर्मचार्‍यांकडून वर्षाला सरासरी १८.६५ लाख डॉलर्स म्हणजे साडेबारा कोटी रूपये कमावते.

या पाहणीत असेही आढळले की अॅपलने २०१५ मध्ये तिच्या ९८ हजार कर्मचार्‍यांच्या कामातून १८३ अब्ज डॉलर्सचा महसूल कमावला आहे. अॅपल यामुळेच जगातला सर्वात व्हॅल्यूएबल ब्रँड बनली आहे. जगातील या सर्वात मोठ्या टेक कंपनीचे मार्केट कॅपिटल ३५ लाख कोटींहून अधिक आहे. २०१५ साली अॅपलकडे २१५०० कोटी डॉलर्स म्हणजे १४.४ लाख कोटींची कॅश होती. या यादीत अॅपलपाठोपाठ गुगल प्रति कर्मचारी कमाई ७.७३ कोटी, सॉफ्ट बँक ६.१५ कोटी, मायक्रोसॉफट ४.९० कोटी, अॅमेझॉन ३.८६ कोटी रूपये यांचा समावेश आहे.

Leave a Comment