शोधले ट्विटरमधील बग; झाला लखपती

twitter
न्यूयॉर्क : एका भारतीयाला ट्विटरतर्फे साईटवरील बग अर्थात त्रुटी शोधून दिल्याबद्दल बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे. अविनाश सिंग नावाच्या व्यक्तीला १० हजार ८० डॉलर्स म्हणजेच अंदाजे ६ लाख ८० हजार रुपयांचे इनाम देण्यात आले आहेत. संगणक सुरक्षा संशोधक म्हणून अविनाश कार्यरत आहे. मार्च महिन्यात त्याने ट्विटरमधील एक त्रुटी त्यांच्या लक्षात आणून दिली. यामुळे कॅशे कोड ऑनलाईन अॅक्सेस करता येत असे. ट्विटरने हा बग सुधारला आणि अविनाशलाही बक्षीस देऊ केले. ट्विटरच्या १४० कॅरेक्टर लिमिटमुळे ट्विटरच्या बग बाऊण्टी पारितोषिकांची रक्कम १४० डॉलरच्या पटीत असते.

Leave a Comment