आता प्ले स्टोअरवर देखील मिळणार ‘PRISMA’ अॅप

prisma
मुंबई : आता गूगल प्ले स्टोअरवर गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ‘प्रिझ्मा’ अॅप उपलब्ध होणार असून केवळ अॅपल यूझर्स हे आतापर्यंत अॅप वापरु शकत होते.

आपल्या गूगल प्ले स्टोअरवरुन अँड्रॉईड यूझर्सही प्रिझ्मा अॅप डाऊनलोड करु शकतात. ७ एमबीचे हे अॅप्लिकेशन अँड्रॉईडच्या ‘किटकॅट’ आणि त्याहून अपडेटेड व्हर्जन सपोर्टिव्ह असेल. पेंटिगसारख्या इफेक्टमुळे कमी कालावधीतच टेक्नोसॅव्हींमध्ये प्रिझ्मा अॅप प्रचंड प्रसिद्ध झाले होते. याआधी केवळ अॅपल यूझर्ससाठी उपलब्ध असणारे हे अॅप आता गूगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध असेल.

इतर एडिटिंग अॅपहून पिझ्मा वेगळे आहे कारण सर्वसाधारण फिल्टरचा एडिटिंगसाठी वापर न करता, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स एल्गोरिदमच्या मदतीने फोटो एडिट करु शकतो. हे अॅप फोटो कॅप्चर केल्यानंतर पेटिंगनुसार एडिट करते. एडिटनंतर तुमचा फोटो ऑईल पेंटिंगसारखा दिसतो. प्रिझ्मा अॅपमध्ये जवळपास २६ इफेक्ट्स असून, फोटोंना आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने एडिट केले जाते.

Leave a Comment