अॅपलने बांधला पोकेमॉन गोच्या जीवावर ३ अब्ज डॉलर्स कमवण्याचा चंग

pokemon1
नवी दिल्ली – दिवसेंदिवस पोकेमॉनची क्रेझ वाढत असल्यामुळे येत्या एक ते दोन वर्षांत अॅपल ही कंपनी जवळपास ३ अब्ज डॉलर्स कमावेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अॅपस्टोअर मधून पोकेमॉन खेळणारे जास्त फीचर्स मिळावीत म्हणून पोकेकॉइन्स विकत घेतात. हे प्रमाण वाढत असून त्यातून अॅपल भरपूर नफा कमावणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

याबाबत गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार १०० पोकेकॉइन्ससाठी अॅप स्टोअरवर ९९ सेंट्स मोजावे लागतात, तर १४,५०० पोकेकॉइन्स घेण्यासाठी ९९.९९ डॉलर्स लागतात. हा गेम जरी मोफत डाऊनलोड होत असला तरी जास्तीच्या फीचर्ससाठी पोकेकॉइन्स विकत घ्यावी लागतात.

अॅपल अॅप स्टोअरच्या माध्यमातून पोकेमॉन गो साठी केलेल्या खरेदीपैकी ३० टक्के रक्कम घेत असल्याचा अंदाज नीधाम अँड कंपनी ब्रोकरेज फर्मचे अॅनालिस्ट लॉरा मार्टिन यांनी व्यक्त केला आहे. लाँच झाल्यानंतरच्या अवघ्या काही दिवसातच पोकेमॉनच्या फक्त अमेरिकेतील अॅक्टिव युजर्सची संख्या २.१ कोटी झाली आहे. यावरून पोकेमॉनची क्रेझ किती आहे याचा अंदाज येईल. कँडी क्रश हा गेम २०१३/१४ मध्ये तुफान गाजला होता आणि त्याने एक अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळवून दिले होते. या बाबतीतही कँडी क्रशचा रेकॉर्ड पोकेमॉन गो मोडेल असा अंदाज आहे.

Leave a Comment