बारामतीत बनलेली पियाज्योची एप्रिलिया स्कूटर

aprilia
इटलीच्या पियोज्यो ग्रुपने बारामतीच्या प्रकल्पात तयार केलेली एप्रिलिया एस आर १५० स्कूटर ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात दाखल होत आहे. या स्कूटरची किंमत ६५ हजार रूपये आहे. या स्कूटरचे डिझाईन इटली मध्येच केले गेले असले तरी तिचे उत्पादन मात्र महाराष्ट्रात केले जात आहे. अत्यंत आकर्षक रूपात ही स्कूटर सादर केली गेली आहे.

युरोपियन स्कूटर डिझाईनची वैशिष्ठ्ये असलेल्या या स्कूटरला १५० सीसीचे एचओएचसी एअरकूल्ड फोर स्ट्रोक इंजिन दिले गेले आहे. इंधन टाकीची क्षमता ७ लिटरची आहे तसेच इंस्ट्रूमेंट कंसोल साधा पण आकर्षक आहे. स्पीडोमीटर, फ्यूएल गेज व विभिन्न फिचर्स सह ट्विन पॉड अॅनालॉग युनिट स्कूटरला दिले गेले आहे.

Leave a Comment