गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची दाटी

saibaba
गुरूपौर्णिमेला साईबाबांच्या शिर्डीत साजर्‍या होणार्‍या वार्षिकोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने शिर्डी येथे भाविक जमले असून हा उत्सव रविवारी साईबाबांच्या मूर्तीसह काढण्यात आलेल्या शोभायात्रेपासूनच सुरू झाला आहे. पुण्यातून ३ हजार भाविक पालखीसह शिर्डी येथे दाखल झाले आहेत. सोमवारी उत्सवाचा मुख्य दिवस साजरा करण्यात आला व या दिवशी मंदिर रात्रभर भक्तांच्या दर्शनासाठी खुले ठेवले गेले होते.

गुरूपौर्णिमेच्या प्रसादासाठी दानशूर भाविक पुढे सरसावले असून त्यांनी साई प्रसादालयात अन्नदानाचा मोठा उपक्रम राबविला आहे. संपूर्ण मंदिर फुलांच्या मनमोहक सजावटीने सजविले गेले आहे. भाविकांच्या सोयीसाठी साई संस्थानने सवतोपरी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र गर्दीच इतकी आहे की बाहेरची हॉटेल्सही तुडुंब भरली आहेत. दर्शन झालेले भाविक आपापल्या गावी परतू लागले आहेत.

Leave a Comment