केटीएम एक्स बो जीटी स्पोर्टस कार

ktmx
ऑस्ट्रीयन कंपनी केटीएम ने त्यांची केटीएम एक्स बो सुपर स्पोर्टसकार बाजारात सादर केली असून आजपर्यंत सादर झालेल्या स्पोर्टस कारमध्ये ती सर्वाधिक आकर्षक असल्याचा दावा केला जात आहे. १९८४ सीसी क्षमतेच्या या कारला ४ सिलींडर ४ स्ट्रोक इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने जोडले गेले आहे.

या दोन सीटर कारचे वजन ८४७ किलो असून इंधन टाकीची क्षमता ४० लिटरची आहे. एक लिटरला ही कार साधारण १२ किमीचे मायलेज देते. ० ते १०० किलोमीटरचा वेग घेण्यासाठी तिला ४ सेकंद लागतात व तिचा टॉप स्पीड आहे २३१ किलोमीटर. कारची चासी कार्बन फायबरपासून बनविली असल्याने कारचे वजन कमी झाले आहे. कारला फ्रेमलेस विंडशिल्ड व वाईड विंडोज दिल्या गेल्या आहेत, त्यामुळे कारच्या सौंदर्यात भर पडली आहे. ही गाडी लवकरच अमेरिकन बाजारात दाखल होत असून तिची किंमत आहे १८६७ पौंड .

Leave a Comment