स्वस्त झाले आयडियाचे नेटपॅक

idea
नवी दिल्लीः मोबाईल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या आयडीया या कंपनीने आपल्या २जी, ३जी, आणि ४जी इंटरनेट पॅकच्या दरात कपात केली असून नवीन दर महाराष्ट्रासह देशभरात लागू झाले आहेत.

आयडीयाच्या १ जीबी पेक्षा कमी नेटपॅकमध्ये ४५ टक्क्यांपर्यंत जास्त डाटा मिळणार असल्याचे आयडीयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. सध्या २२५ रुपयांच्या दरात आयडीया ग्राहकांसाठी नेटपॅक देते. इंटरनेटचा लाभ प्रत्येक वापरकर्त्यांला घेता यावा, यासाठी ही दर कपात आहे. या दर कपातीमुळे ग्राहक संख्या वाढण्यास मदत होईल, अशी माहिती आयडीयाचे मुख्य मार्केटींग अधिकारी शशि शंकर यांनी दिली. यापूर्वी १९ रुपयांत ७५ एमबी २जी डाटा तीन दिवसांसाठी मिळत होता. नवीन दरांनुसार ११० एमबी डाटा मिळणार आहे. ३जी आणि ४जी नेटपॅक्सच्या दरातही अशीच कपात करण्यात आली आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Comment