मोफत बदलून मिळणार फाटक्या नोटा !

note
नवी दिल्ली – आता मोफत फाटलेल्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. याबाबतचे निर्देश जारी करत भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना २० नोटा बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येता कामा नये असे सांगण्यात आले. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये या नोटा बदलण्यात येतील. यासाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. एकावेळी फक्त २० नोटाच बदलण्यात येतील. यानंतरच्या नोटांसाठी शुल्क आकारण्यात येईल. पाच हजार किमतीच्या २० नोटा बदलता येईल. आतापर्यंत नोटा बदलण्यासाठीची सुविधा फक्त बँकांच्या चेस्ट शाखांपुरतीच मर्यादित होती. ज्या शाखांमध्ये चलने चेस्ट करण्यात येत होत्या त्या ठिकाणीच नोटा बदलण्यात येत असे.

Leave a Comment