ट्विटरवर आता अपलोड करू शकता मोठ्या जीआयएफ (GIF) फाईल्स

twitter
मुंबई : आता टाईमलाईनवर जीआयएफ फाईल म्हणजेच ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मेट फाईल अपलोड करण्याची क्षमता ट्विटरने ५ एमबीवरून १५ एमबी पर्यंत वाढवली असून सध्या ही सुविधा सध्या डेस्कटॉपवरूनच ट्विटरवर जीआयएफ फाईल अपलोड करणाऱ्यांसाठी आहे.

जर का तुम्ही ट्विटर टाईमलाईनवर मोबाईल अॅपमधून जीआयएफ फाईल अपलोड करणार असाल तर तुम्हाला फक्त ५ एमबीची फाईलच अपलोड करता येणार आहे. मोबाईल अॅपप्रमाणेच ट्वीटरच्याच ट्वीटडेक या डेस्कटॉप अॅपवरही पूर्वीचीच ५ एमबीची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. अतिशय छोट्या कालावधीचे व्हिडीओ जीआयएफ या फॉर्मॅटच्या मदतीने शेअर करता येतात. अलीकडे ट्विटरसह अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर जीआयएफ फाईल्सचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून जीआयएफ हा फॉरमॅट अल्पावधीतच लोकप्रिय झाला असल्यामुळेच जास्त मोठ्या साईजच्या जीआयएफ फाईल्स अपलोड करायला ट्वीटरने सुरूवात केली आहे.

Leave a Comment