तब्बल २० हजारांनी स्वस्त झाला ब्लॅकबेरी पासपोर्ट

blackberry
मुंबई : तब्बल २० हजार रुपयांची ब्लॅकबेरीने त्यांच्या स्मार्टफोनमध्ये कपात केली असून २०१४मध्ये लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनची किंमत ४९,९९० एवढी होती. आता हाच फोन फ्लिपकार्टवर २९,९९० रुपयांना मिळत आहे, तर अॅमेझॉनवर याची किंमत ३३,९५० रुपये एवढी आहे. याबरोबरच हा स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर १४,५०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. यानंतर फोनची किंमत १५,४९० एवढी होईल.

ब्लॅकबेरी पासपोर्ट फोनला ४.५ इंचाची एलसीडी टच स्क्रीन आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सल रिअर आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये २.२ GHz क्वाडकोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि ३ GB रॅम आहे. ब्लॅकबेरी पासपोर्ट कंपनीची नवीन ऑपरेटिंग सिस्टीम ब्लॅकबेरी १०.३ ओएसवर चालणारा पहिला फोन आहे.

Leave a Comment