अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोडवाला सॅमसंगचा नवा टॅब लॉन्च

samsung
मुंबई : आपला नवा टॅब ‘गॅलक्सी जे मॅक्स’ मोबाईल उत्पादक सॅमसंग कंपनीने लॉन्च केला असून ७ इंचाचा डिस्प्ले असणारा हा टॅब १३ हजार ४०० रुपयांना मिळणार आहे. सॅमसंगचा हा टॅब शाओमीने नुकताच लॉन्च केलेल्या शाओमी मी मॅक्सला स्पर्धक ठरणार आहे. या टॅबची जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ऑफलाईन आणि ऑनलाईन विक्रीला सुरुवात केली जाणार आहे.

या टॅबमध्येही सॅमसंगच्या इतर ‘जे’ सीरीजप्रमाणे अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोड देण्यात आला आहे. या मोडवर ५० टक्के डेटाची बचत होऊ शकते. एअरटेल प्रीपेड ग्राहकांना ‘जे’ मॅक्ससोबत ६ महिन्यांपर्यंत डबल डेटा ऑफर मिळणार आहे.

सॅमसंग गॅलक्सी जे मॅक्समध्ये ७ इंचाचा १२८०×८०० पिक्सेल रिझॉल्युशनवाला डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर १.५GHz क्वाड-कोर प्रोसेसर, १.५ जीबी रॅम, १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज जी एसडी कार्डच्या सहाय्याने २०० जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा टॅब ड्युअल सिम सपोर्टिव्ह आहे. यात ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचसोबत VoLTE फीचर आणि ४जी, ऑडिओ जॅक, एफएम रोडिओ, वायफाय, ब्लूटूथ ४.०, GPS कनेक्टिव्हिटीची सुविधा देण्यात आली आहे.

Leave a Comment