१२-१३ जुलैला बँक कर्मचारी संघटनेचा देशव्यापी संप!

strike
नवी दिल्ली : १२-१३ जुलैला अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (एआयबीईए) देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी १२ जुलैला मुख्य स्टेट बॅंकेच्या पाच सहयोगी बँकांचे सर्व कर्मचारी संपावर जाणार आहे. स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाला व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या पाच सहयोगी बँका स्टेट बँकेत विलीन करण्याचे सरकारने ठरविले आहे.

दुसर्‍या दिवशी सर्वच बँकांमधील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे एआयबीईएचे सरचिटणीस वेंकटाचलम यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांचा स्टेट बॅंकेमध्ये सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाला आणि आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाला विरोध आहे.

Leave a Comment