बंगळुरु – भारतातील बंगळूर बेस्ड स्टार्टअप कंपनी ‘आथर एनर्जी’ने आपली नवी सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रीक स्कूटर आथर ई-स्कुटर एस ३४० ही लवकरच बाजारपेठेत दाखल करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
लवकरच येणार भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर
मद्रास आयआयटीमध्ये या प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली होती. ही गाडी तीन वर्षांच्या रिसर्चनंतर तयार करण्यात आली आहे. बंगळुरूमधील स्टार्टअप इव्हेंटमध्ये ‘एस ३४०’ ही स्मार्ट स्कूटर लाँच करण्यात आली होती. ही संपुर्णपणे ‘मेक इन इंडिया’ ई स्मार्ट स्कूटर आहे.
विजेवर चालणारी ‘एस ३४०’ ही स्मार्ट स्कूटर आहे. यामध्ये अत्याधुनिक डिजीटल टचस्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे. यात गाडी चालक स्वत:चे पर्सनलाईज्ड प्रोफाईल तयार करण्याची सुविधा आहे. जीपीएस नेव्हिगेशनच्या सुविधेमुळे गाडी चालक हवा असलेला मार्ग सेट करु शकतो. यासोबत आपल्याला हवे असलेले ठिकाण किती दूर आहे यासंदर्भातीलही माहिती या डिस्प्लेवर मिळणार आहे. या गाडीच्या बॅटरीला एक तासापेक्षाही कमी वेळेत चार्ज करता येईल.
‘आथर ई-स्कुटर एस ३४०’ या स्कूटचे डिझाइन पासून बनविण्याचे संपुर्ण काम भारतातच करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया कॅम्पेनमुळे संपुर्ण भारतीय बनावटीच्या या स्कूटरला आणखीन लोकप्रियता मिळण्याची शक्यता आहे. ही स्कूटर २५-४० किलो मीटर प्रती तास या स्पीडने चालवली जावू शकते. तर हाय स्पीडमध्ये ही स्कूटर ७५ किलो मीटर प्रती तास इतका स्पीड घेऊ शकते.