रिलायन्स देणार अवघ्या २९९९ रुपयात ४जी स्मार्टफोन

reliance
मुंबई : रिलायन्सने आपल्या बहुचर्चित लाईफ स्मार्टफोनच्या किमतीत २५ टक्क्यांची कपात केली आहे. त्याचबरोबर दोन वर्षांच्या वॉरंटीसह जियो नेटवर्कवर तीन महिन्यांसाठी मोफत ४जी इंटरनेट डेटाही मिळणार आहे. फ्लेम २, फ्लेम ४, फ्लेम ५, फ्लेम ६, वॉटर २ आणि विंड ६ या स्मार्टफोनवर ही सूट मिळणार असून फ्लेम ४, फ्लेम ५, फ्लेम ६ यांची किंमत एक हजार रुपयांनी कमी होऊन दोन हजार ९९९ रुपये झाली आहे.

फ्लेम २ ची किंमत १३०० रुपयांनी कमी होऊन ३ हजार ४९९ रुपये झाली आहे. विंड ६ आता ५ हजार ९९९ तर वॉटर ९ फोन ९ हजार ४९९ रुपयांना मिळणार आहे. यूझर्सना २ हजार ९९९ रुपयांचा ४जी स्मार्टफोन खरेदी केल्यावर तीन महिन्यांसाठी ४जी डेटा आणि फ्री व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या मुंबई, दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सर्कलमधील सीडीएमए (CDMA) ग्राहकांना आपली सर्व्हिस अपग्रेड करण्याची संमती आहे. रिलायन्स जियो इन्फोकॉमच्या करारानुसार यूझर्सना ४जी सेवा मिळेल.

Leave a Comment