‘फ्रीडम’च्या ग्राहकांची पुन्हा निराशा

freedom
मुंबई : पुन्हा एकदा ‘रिंगिंग बेल्स’ कंपनीचा वादग्रस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम २५१’ वादात अडकला आहे. उद्यापासून म्हणजेच ३० जूनपासून या स्मार्टफोनची डिलिव्हरी होणार असल्याचा वायदा कंपनीने केला होता. पण आता कंपनीने याही बाबतीत एक पाऊल मागे घेतले असून आता या स्मार्टफोनची डिलिव्हरी ६ जुलैपासून होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

त्यात तर आता कंपनीने या फोनसाठी एक नवी अटही समोर ठेवली आहे. या फोनची पैसे भरलेल्या ग्राहकांना सरळ सरळ डिलिव्हरी न देता ‘लकी ड्रॉ’ काढला जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

जवळपास ७ करोड लोकांनी फ्रीडम २५१ या स्मार्टफोनसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांच्या इतकी मोठी संख्या आणि फोनच्या युनिटसची संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, ३५० ग्राहकांपैंकी एकाच ग्राहकाला हा स्मार्टफोन देण्यात येणार आहे.

Leave a Comment