सोशल मिडियावरील हा मेसेज आहे निव्वळ अफवा

facebook
मुंबई : सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर फेसबुकवरील पोस्ट्स सार्वजनिक होणार असल्याचा एक मेसेज व्हायरल झाला असून फेसबुकवर तुम्ही ‘ठराविक’ मेसेज पोस्ट न केल्यास तुमच्या सर्व पोस्ट, फोटो, व्हिडिओ पब्लिक होतील, अशी भीती या मेसेजमध्ये दाखवली जात आहे. ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा मेसेज म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे फेसबुककडूनच स्पष्ट करण्यात आले आहे. जो मेसेज व्हायरल होत आहे, या बनावट मेसेजमध्ये तो कॉपी करुन फेसबुकवर पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात येते. अनेक जण याला कायद्याचा दाखला दिल्याने बळी पडतात आणि मित्रांनाही ही ‘व्हायरल लागण’ करण्यास भाग पाडतात.

फेसबुकवर अशाप्रकारचे मेसेज पसरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आता अशा व्हायरल अफवांची सवय जुन्या जाणत्या फेसबुकवासियांना झाली आहे. थोड्या थोड्या दिवसांनी हे मेसेज डोक वर काढत असतात. मात्र नव्या यूझर्सना ही भीती ठरत आहे. मेसेजमध्ये ज्या UCC चा उल्लेख आहे, ते अमेरिकेतील एक कमर्शिअल लॉ कोर्ट आहे. सोशल नेटवर्किंग साईटवरील प्रायव्हसी सेटिंग्सशी त्याचा काहीही संबंध नाही. तुमच्या पोस्टमध्ये उजव्या हाताला असलेल्या बटणावर तुम्ही प्रायव्हसी ठरवू शकता. कुठलीही पोस्ट कॉपी-पेस्ट केल्याने पोस्ट सार्वजनिक करणे किंवा न करणे ठरत नसल्यामुळे यूझर्सनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन फेसबुकतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment