पित्तावरचे सोपे घरगुती उपाय

acidity
पित्त किंवा अॅसिडीटी ची अनेक कारणे सांगितली जातात. मात्र पित्त उसळले की पोटातील जळजळ, छातीतील जळजळ, क्वचित कधी उलटी यांनी माणूस हैराण होऊन जातो. रात्रीची जागरणे, खूप काळ उपाशी राहणे, फास्ट फूडचे सेवन, वेळी अवेळी खाणे, अनियमित दिनचर्या व वेदनाशामक गोळ्यांचे सेवन ही पित्त वाढण्याची मुख्य कारणे सांगितली जातात. मात्र घरच्या घरीच अगदी सोपे सहज उपाय करून अॅसिडीटीवर उतार पडू शकतो. त्याची ही माहिती.

असिडीटी झाली असेल तर कांहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खावा. अॅसिडीटीपासून त्वरीत आराम मिळतो. सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने अॅसिडीटी कमी होते. खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही अॅसिडीटीतून आराम मिळतो.

tulsi
नेहमी अॅसिडीटीचा त्रास होण्यार्‍या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खाव्यात व त्यावर थोडे पाणी प्यावे. रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते. निममित तुळशीचे सेवन अॅसिडीटी मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे.

जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते. तसेच मुळ्यावर लिंबू व काळेमीठ घालून खाल्यानेही अॅसिडीटीपासून आराम मिळतो. मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो. पण पित्ताच्या उलट्या होत असतील तर फ्रिजमध्ये साखर घातलेले दूध थंड करून त्यात बर्फ घालून पिण्याने उलटया त्वरीत थांबतात.

Leave a Comment