रिलायन्स देणार ९३ रुपयांत १० जीबी ४जी डेटा

reliance
मुंबई : सध्या ४जीचे युग सुरु झाले असले तरी अनेकांना हा डेटापॅक परवडत नसल्याने काहीजण अद्यापही २जी आणि ३जीचा वापर करत आहेत. मात्र आपल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ स्वस्तात मस्त ऑफर घेऊन येत आहे.

९३ रुपयांत या ऑफरअंतर्गत तुम्हाला १० जीबी ४जी डेटा वापरता येणार आहे. लवकरच ही सुविधा सुरु होणार आहे. मात्र ही सुविधा केवळ सीडीएमए ग्राहकांना मिळणार आहे. सध्या ही सुविधा आंध्रप्रदेश, दिल्ली, गुजरात, कोलकाता, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश(पूर्व), उत्तर प्रदेश(पश्चिम), मुंबई, ओदिशा, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर जुलैपर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, राजस्थानसह सहा सर्कलमध्ये ही सुविधा विस्तारित केली जाईल. इतर कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओची ही सुविधा स्वस्त असल्याने ग्राहकांना कमी खर्चात इंटरनेटचा वापर करता येणार आहे.

Leave a Comment