‘ब्रेक्झिट’मुळे महागले सोने-चांदी

gold
मुंबई – भारतीय शेअर बाजार ब्रिटन युरोपियन महासंघातून बाहेर पडल्याने प्रथमच ९०० पेक्षा अधिक अंकाने गडगडल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली असून सर्वसामान्यांना ऐन लग्न सराईत सोन्यासाठी १७०० तर चांदी १४०० रुपये अधिक मोजावे लागणार आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पौंड आणि रुपया घसरल्याने ही दरवाढ झाली आहे.

ब्रिटन युरोपीयन महासंघातून बाहेर पडले असून भारतीय बाजारावर त्याचा परिणाम झाला असून सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया ९६ पैशांनी घसरल्याने ही वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. तर सोन्या चांदीच्या दरात ही वाढ झाली आहे. आता सोन्याची किंमत ३१ हजार ६१४ रुपयांनी खरेदी करावे लागणार आहे. तर चांदी ४२ हजार रुपये किलो झाली आहे. सोन्याच्या दराने दोन वर्षांपूर्वीची उच्चांकी पातळी गाठली आहे. एकीकडे सेन्सेक्स घसरला, दुसरीकडे सोने-चांदीच्या दर वधारल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर दुहेरी संकट उभे राहिले असून त्यास तोंड देण्यासाठी सरकार सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment