५०० कोटी पगाराच्या नोकरीला निकेश अरोरांचा रामराम

nikesh-arora
नवी दिल्ली – तब्बल ५०० कोटी रुपयांचा वार्षिक पगार असलेले सॉफ्टबँकेचे अध्यक्ष आणि सीओओ निकेश अरोरा यांनी राजीनामा दिला आहे. समभाग-धारकांच्या वार्षिक बैठकीनंतर ते पद सोडतील. सीईओपदासाठी आपण आणखी प्रतीक्षा करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपला भारतीय स्टार्टअपला पाठिंबा कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांना दिलेल्या भरीव पगाराचा बँकेला तितकासा फायदा झाला की नाही, याबद्दल बँकेच्या गुंतवणूकदारांना शंका होती. तथापि, कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यांना क्लीन चिट दिली होती.

Leave a Comment