नव्या दमात येणार मारुती सुझुकी एस क्रॉस

maruti
नवी दिल्ली : लवकरच बाजारात भारतातील प्रसिद्ध कार निर्मित कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची एस क्रॉस ही पेट्रोल वेरियंट असणारी कार नव्या दमात येणार आहे. या कारमध्ये १.३ लिटर आणि १.६ लिटरच्या पर्यायासह DDiS डिझेल इंजिन देण्यात येणार आहे. ऑटोकार इंडियाच्या अहवालानुसार, या कारमध्ये पेट्रोल वेरियंटमध्ये प्रामुख्याने चार सिलिंडर सुझुकी एम१५ १.५ लिटर पेट्रोल इंजन देण्यात येणार आहे. १०० PS पॉवर आणि १३३ Nm चा टार्क निर्माण करेल. ही कार या वर्षाच्या शेवटी लाँच केली जाऊ शकते.

Leave a Comment