युजरचा रक्तगट फेसबुकवर दाखवा

facebook
कॅलिफोर्निया – युजर्सच्या कव्हर पेजवर रक्तगट लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने दाखवावा. ज्यामुळे जुळणारा रक्तगट न मिळाल्याने होणारे मृत्यु रोखण्यास मदत होईल, अशी कल्पना बांगलादेशमधील एका युजरने मार्क झुकेरबर्ग यांना सुचविली आहे.

मंगळवारी संध्याकाळी इन्स्टाग्रामबाबत माहिती देणारी पोस्ट फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी लिहिली होती. नेहमीप्रमाणे झुकेरबर्ग यांच्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळाला. या पोस्टला आतापर्यंत साडे तीन लाख पेक्षा अधिक युजर्सनी लाईक केले आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. राबियल इस्लाम नावाच्या एका युजरने फेसबुकच्या कव्हर पेजवर रक्तगट दाखविण्याची कल्पना सुचविली असून त्याचबरोबर राबियलने आपण विद्यार्थी असून बांगलादेशमधील असल्याचे प्रतिक्रियेत लिहिले आहे. झुकेरबर्ग तुम्हाला माहिती आहे प्रत्येक क्षणाला अनेक जण रुग्णालयात दाखल होत असतात. त्यापैकी अनेक जण जुळणारा रक्तगट न मिळाल्याने मृत्युमुखी पडत असतात. जर फेसबुकने प्रत्येक युजरला रक्तगट दाखविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर त्याचा मोठा फायदा होऊ शकेल, अशी सूचना राबियलने केली आहे. तसेच फेसबुक नेहमीच मानवकल्याणाचा विचार करत असून आपल्या सूचनेकडे दुर्लक्ष न करता त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या सूचनेचे इतर युजर्सनी स्वागत केले असून त्याच्या प्रतिक्रियेला साडे सहा हजारपेक्षा अधिक लाईक्‍स मिळाल्या असून 800 पेक्षा अधिक जणांनी त्याच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Leave a Comment