सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘हा’ अभंग

viral
मुंबई : अभंगाला किंवा भजनाला नेहमीच पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… श्री नामदेव तुकाराम असे म्हणत सुरुवात होते. पण सध्या सोशल मीडियावर ‘हा’ अभंग व्हायरल होत असून या व्हिडिओची विशेषबाब म्हणजे यामध्ये अनोख्या ढंगात पॉप म्युझिक वाजवले असले तरीही जो भाव आहे तो वारीचाच असल्यामुळे या व्हिडिओला अधिक पसंती मिळताना दिसत आहे. अभंग रिपोस्ट या ग्रुपद्वारे आणखी एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.

२८ जून रोजी आळंदीहून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होईल आणि १४ जुलैला पालखी पंढरीत दाखल होईल, ही माहिती पालखीचे मालक राजेंद्र आकफळकर यांनी सांगितले आहे. वारीच्या दिवसात सोशल मीडिया देखील विठ्ठलाच्या नामस्मरणात अगदी नाहून निघावेत यासाठी यांनी हा व्हिडिओ तयार केला आहे.

Leave a Comment