
इंडोनेशियात आजही अनेक हिंदू मंदिरे आहेत आणि त्यातील अनेक मंदिरांबाबत असलेली रहस्ये आजच्या विज्ञानयुगातही उलगडली गेलेली नाहीत. त्यात जावा बेटावर असलेल्या शिवमंदिरातील स्फटिकाच्या शिवलिंगाबाबतही असेच रहस्य निर्माण झाले आहे.शेकडो वर्षांपूर्वीचे हे शिवलिंग कंडी सुकुह नावाच्या ठिकाणी उत्खननात सापडले आहे.
या स्फटिकाच्या शिवलिंगात आहे अमृत?
या मंदिर उत्खनतात सापडलेल्या अनेक मौल्यवान कलाकृती इंडोनेशियाच्या राष्ट्रीय संग्रहालयात स्थानांतरीत केल्या गेल्या आहेत. त्यावेळी सापडलेल्या या स्फटीकाच्या शिवलिंगात आत पाण्यासारखा पदार्थ आहे. शेकडो वर्षापूर्वीच्या या शिवलिंगातील हा द्रव आजही सुकलेला नाही. वैज्ञानिकांना हा द्रव काय असावा याचा उलगडा करता आलेला नाही मात्र स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे अमृतमंथनातून निघालेले अमृत या शिवलिंगात द्रव स्वरूपात आहे. हा द्रव दैवी आहे असाही दावा केला जात आहे.
ज्यावेळी येथे उत्खनन सुरू होते तेव्हा पाण्यासारखा द्रव असलेल्या एका पितळी भांड्यात हे स्फटिकाचे शिवलिंग ठेवलेले आढळले होते. विशेष म्हणजे इतकी वर्षे लोटल्यावर या पितळी भांड्यातले पाणीही सुकलेले नव्हते असेही समजते.
