धोकादायक परिसराची सुरक्षा राखणार रामसी रोबो

gama
धोकादायक, गलिच्छ व गस्तीसाठी ज्या भागात जाण्यास रक्षक तयार नसतील अशा भागांची सुरक्षा आता रोबो करू शकणार आहेत. गामा टू रोबोटिक्स कंपनीने असा हायटेक रोबो तयार केला आहे. रामसी नावाचा हा रोबो हायटेक तंत्रज्ञानाने युक्त आहे व स्मशानांसारख्या ठिकाणी तो गस्त घालेल तसेच घुसखोरीची माहितीही देऊ शकेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

इन्फ्रारेड व्हिजन, लेजर रडार नेव्हीगेशन, ३६० डिग्रीत फिरणारे कॅमेरे, हीट सेन्सर, टॉक्सिक गॅस डिटेक्शन अशी त्याची फिचर्स आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रामसीची चोरी होऊ शकत नाही, तो हॅक होऊ शकत नाही आणि खराबही होणार नाही. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ल्यू पिकस म्हणाले या रोबोमुळे सुरक्षेच्या क्षेत्रात क्रांती होणार आहे. कारण एरव्ही एखाद्या धोकादायक जागेच्या सुरक्षेसाठी जेवढा खर्च करावा लागतो त्या खर्चाच्या १ टक्का किंमतीतच हा रोबो मिळू शकणार आहे.

Leave a Comment