
मुंबई – जगभरात सर्वत्र आज फादर्स डे साजरा करण्यात येत असून वडिलांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस असतो. इतरांप्रमाणेच गुगलनेही फादर्स डे निमित्त एक खास गुगल डुडल तयार करुन शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकासाठीच आपले वडील हे सुपरहिरो असतात. वडिलांच्या प्रेमाचा आज दिवस. बाबा, पप्पा, डॅडी अश्या विविध लाडक्या नावाने आपण वडिलांना हाक मारतो. सर्वांच्या मनात आपल्या वडिलांविषयी एक वेगळेच प्रेम असते.
गूगलचे ‘फादर्स डे’ निमित्त खास डुडल
वडील आणि मुलाचे नाते संबंध उलगडणारे खास डूडल गूगलने फादर्स डे निमित्त तयार केले आहे. या डूडलमध्ये मुलगा आणि वडिलांच्या आकाराचे बुट दाखवण्यात आले आहेत. आजच्या वर्ल्ड फादर्स डेनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे.
