डाटाविंडचे हायब्रिड नोटबुक्स लाँच

darawind
नवी दिल्ली : – दोन नवे ७डीसी+ आणि ३जी ३जी७+ नेटबुक्स कमी किंमतीमध्ये टॅबलेटस् उत्पादन करणा-या प्रसिद्ध डाटाविंड या कंपनीने लाँच केले आहेत.

याबाबत माहिती देताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह तुली यांनी सांगितले की, हा नेटबुक वेगळा होऊ शकणा-या ब्लूटूथ २ इन १ कीबोर्डसह क्लासी स्लिम लुक आणि स्ट्राँग फंक्शनलिटी असल्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हा नेटबुक गेम चेंजर ठरणार आहे.

असे आहेत नेटबुक्सचे फिचर्स – याचा डिस्प्ले ७ इंचाचा मल्टी-टच कॅपेसेटिव्ह स्क्रीन असून यात डय़ुअल कोर कोर्टेक्स स्क्रीन ए७चा प्रोसेसर देण्यात आला आहे. याचे ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड ४.४.२ बेस आहे. यात २ एमपी रिअर, ०.३ एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्या आला आहे. त्याचबरोबर ३२ जीबीपर्यंत स्टोरेज क्षमता आणि वायफाय हॉटस्पॉट, वायफाय डायरेक्ट, ब्लूटूथ आणि जीपीएस सुविधा देखील देण्यात आली आहे.

Leave a Comment