‘मायक्रोसॉफ्ट’ आता चरसच्या व्यापारात

Microsoft
वॉशिंग्टन: अमेरिकेतील अनेक राज्यांनी चरसच्या व्यापारावरील निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेण्याचा विचार सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ने चरसच्या व्यापारात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चरसच्या उत्पादनापासून ते वितरणापर्यंत सर्व नोंदी ठेवण्याचे ‘सॉफ्टवेअर’ कंपनीने विकसित केले आहे.

औषधी आणि मनोरंजन उत्पादनासाठी चरसचा व्यापार कायदेशीर करण्याबाबत अनेक राज्यांनी पुढाकार घेतला असला तरीही अद्याप अमेरिकन संघराज्याच्या कायद्यात या व्यापाराला बंदी आहे. कॅलिफोर्नियासह अन्य ४ राज्य या विषयावर आपले मत देणार आहेत. त्यानंतर चरस औषधी आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वापरण्यास मोकळीक मिळू शकते.

हा व्यापार खुला झाल्यास ‘सीड टू सेल’ अशा सर्व नोंदी करणारे; अर्थात चरसचे उत्पादन झाल्यापासून त्याच्यावरील प्रक्रिया उत्पादने आणि त्यांच्या वितरणापर्यंत सर्व नोंदी ठेवणारे ‘सॉफ्टवेअर’ ‘मायक्रोसॉफ्ट’ उपलब्ध करून देणार आहे. या ‘सॉफ्टवेअर’मुळे मर्यादित कारणांसाठी खुला केलेला चरस या मादक पदार्थाचा व्यापार नियंत्रित करणे शक्य होणार आहे. आपले हे उत्पादन कंपनी केवळ संघराज्याच्या, राज्यांच्या शासकीय यंत्रणांना आणि स्थानिक प्रशासनांना उपलब्ध करून देणार आहे.

Leave a Comment