अॅमेझॉन फ्लिपकार्टची मुस्कटदाबी करण्याच्या प्रयत्नात

combo
नवी दिल्ली – देशातील मोठय़ा ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टने कमिशन वाढविण्याच्या निर्णयाच्या तीन दिवसांपूर्वीच अॅमेझॉनने अधिक विकणा-या उत्पादनांसाठी आपले रेफरल शुल्क कमी करण्याची घोषणा केली असून याचा थेट लाभ विक्रेते आणि ग्राहकांना होणार आहे.

कमिशनमध्ये वाढ करण्याच्या विरोधात फ्लिपकार्टच्या विक्रेत्यांनी कंपनीतून बाहेर पडण्याची घोषणा केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे. अॅमेझॉनने लॅपटॉप, डेस्कटाप आणि सर्व्हर, मोबाईल, टॅबलेट तसेच इतर विभागांमधील शुल्कात १ ते ७ टक्क्यांपर्यंत घट केली आहे. तर फॅशन, लाईफस्टाईल या विभागात कमिशनमध्ये वाढ केली आहे. काही विभागांमध्ये दरात घट केली आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी मदत होणार आहे. तसेच व्यवसायामध्ये वाढ करणेही शक्य होणार आहे. विक्रेत्यांनी मागील तीन वर्षात या प्लॅटफॉर्मवर मोठे यश मिळविले आहे. कंपनीने १०० विक्रेत्यांसह सुरुवात केली होती आणि सध्या कंपनीकडे ८५ हजारपेक्षा जास्त विक्रेते आहेत. कंपनी दररोज ९० हजारपेक्षा अधिक उत्पादने बाजारात दाखल करत आहे.

Leave a Comment