सॅमसंगचा अॅपलला ‘दे धक्का’

samasung
मुंबई : गेल्या तीन महिन्यात स्मार्टफोन विक्रीचा नवा विक्रम दक्षिण कोरियातील सॅमसंग कंपनीने केला असून सॅमसंगच्या तीन महिन्याच्या अकडेवारीवरून या वर्षभरात ३२ कोटी स्मार्टफोन विक्रीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेतील एका कंपनीने केलल्या सर्वेक्षणानुसार गेल्या तीन महिन्यात सॅमसंगने ८.१५ कोटी स्मार्टफोनची विक्री केली. तर दुसरीकडे याच कालावधीमध्ये अॅपलने ५.१६ कोटी स्मार्टफोनची विक्री केली. सर्वाधिक स्मार्टफोनची विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये १२ चीनी कंपन्याचाही समावेश असून मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीचाही या १२ कंपन्यांच्या यादीत समावेश आहे. कंपनीने गेल्या तीन महिन्यात ५० लाख स्मार्टफोनची विक्री केली. या आकडेवारीवरून वर्षभरात कंपनी २.५ कोटी स्मार्टफोन विक्रीचा अंदाज बांधला जात आहे.

याबाबत अॅन्ड्राइड डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, चीनी कंपनी हुवाइ तिसऱ्या स्थानी, ओप्पो चौथ्या, शिओमी पाचव्या, विवो सहाव्या, झेडटीइ आठव्या, लिनोवो नवव्या, टिसीएल दहाव्या आणि मेजू अकराव्या स्थानी आहे. सोनी, मायक्रोसॉफ्ट आणि कुलपॅडसारख्या कंपनी या टॉप १२ यादीतून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. आयसी इनसाइटनुसार जगभरात स्मार्टफोनच्या विक्रीत पाच पटीने वाढ झाली आहे. चालू वर्षी १.५ अरब स्मार्टफोनच्या विक्रीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment