अतिगरम कॉफीमुळे होऊ शकतो कॅन्सर

coffee
पॅरिसः अतिगरम कॉफी प्यायल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. ६५ डिग्री सेल्सिअसपेक्षा कॉफी जास्त गरम असेल तर कॉफी कॅन्सरचे कारण बनू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

कोणतेही पेय ६५ डिग्री पेक्षा जास्त गरम असेल तर त्याने कॅन्सर होऊ शकतो, असे या संशोधनातून समोर आले आहे. कॉफी ही आरोग्यास हानिकारक नाही, मात्र अधिक गरम असल्यास कॅन्सरची शक्यता असल्याचे समोर आले आहे. कॅन्सरवर संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय एजन्सी आयएआरसी या संस्थेने देखील कॉफी जास्त गरम असल्यास कॅन्सर होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला होता.

हे संशोधन चीन, ईराण, तुर्की, दक्षिण अमेरिका या ठिकाणी करण्यात आले. या ठिकाणी कॉफी जवळपास ७० डिग्री पर्यंत गरम केली जात असल्यामुळे येथे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते, असे आयएआरसीने सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment