
मुंबई: अवघ्या काही अवधीसाठी मोटोरोलाने मोटो एक्स प्ले स्मार्टफोनवर घसघशीत सूट दिली असून या ऑफरमध्ये मोटो एक्स प्ले स्मार्टफोनवर २००० रुपयापर्यंत डिस्काउंट मिळू शकते आणि ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर ही खास ऑफर देण्यात आली आहे.
मोटो एक्स प्लेवर २००० रुपयापर्यंत डिस्काउंट
१७,४९९ रुपये एवढी मोटो एक्स प्ले १६जीबी व्हर्जनची किंमत आहे. तर ३२ जीबी डिव्हाइसची किंमत १८९९९ एवढी आहे. मात्र फिल्पकार्टवरील ऑफरमुळे १६ जीबीचा स्मार्टफोन १५४९९ रुपयात मिळणार आहे. तर ३२ जीबीचा डिव्हाइस १७४९९ रुपयात मिळणार आहे. फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.
