उत्पादक फ्लिपकार्टला उत्पादने विकणार नाही

flipkart
नवी दिल्ली – दिवसेंदिवस देशाची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट’च्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत असून रिटर्न पॉलिसीमुळे भडकलेल्या जवळपास १३०० विक्रेत्यांनी फ्लिपकार्टवर उत्पादने विकण्यास नकार दिला आहे. कंपनीच्या सतत बदलत्या धोरणांमुळे आमचे मोठे नुकसान होत असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.

कंपनीच्या नवीन रिटर्न पॉलिसीनुसार, आता इलेक्ट्रॉनिक्ससह अन्य उत्पादने ३० ऐवजी फक्त १० दिवसांमध्ये रिटर्न करावीत. आजमितीस फ्लिपकार्टचे ९० हजार विक्रेते असून अनेक सदस्यांनी सध्यातरी उत्पादने विकण्यास नकार दिला आहे. धोरणांमध्ये एकतर्फी बदल केल्यामुळे व्यवसायामध्ये तेजीने घट होत असल्यामुळे व्यापा-यांकडून याला मोठा विरोध होताना दिसत आहे.

Leave a Comment