फ्लिपकार्टने बदलली आपली रिटर्न पॉलिसी

flipkart
नवी दिल्ली – आता खरेदी केलेली एखादी वस्तू परत करण्याच्या पॉलिसीत ई-कॉमर्स संकेतस्थळ असलेल्या फ्लिपकार्टने बदल केला असून ग्राहकांनी या संकेतस्थऴावर एखादी वस्तू घेतल्यास आणि ती पसंत न पडल्यास, ती वस्तू परत करण्याची मुदत फ्लिपकार्टने ठेवली आहे.

सध्या या मुदतीचा कालावधी ३० दिवसांचा आहे. मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून सर्वाधिक जास्त म्हणजेच मोबाईल, इलेक्ट्रानिक्स आणि बुक अशा वस्तूंचा परतावा करण्याचा कालावधी कमी करण्यात येणार आहे. अवघ्या १० दिवसांचा हा कालावधी असणार आहे. तर, फुटवेअर, आयवेअर, ज्वेलरी, कपडे, घड्याळ आणि सौंदर्य प्रसाधने या वस्तूंवरील परत करण्याची मुदत सध्या लागू आहे तशीच म्हणजे ३० दिवसांची राहणार आहे. याचबरोबर फ्लिपकार्टला विक्रेत्यांना जास्त कमिशन या नव्याबदलानुसार द्यावे लागणार आहे. दरम्यान, या नव्या फ्लिपकार्टच्या नव्या पॉलिसीची अंमलबजावणी येत्या २० जूनपासून करण्यात येणार आहे.

Leave a Comment