१० लाख रुपयांचा स्मार्टफोन लॉन्च

solarin
नवी दिल्ली – लंडनमध्ये इस्त्राईलमधील स्टार्टअप कंपनी सिरिन लॅब्सने महागडा स्मार्टफोन लॉन्च केला असून या स्मार्टफोनची किंमत १६ हजार डॉलर म्हणजेच सुमारे १० लाख रुपये आहे. या स्मार्टफोनमधील संपूर्ण कम्युनिकेशन २५६ बिट चिप-टू-चिप एन्क्रिप्टेड म्हणजेच सिक्युर क्रिप्टो प्रोसेसिंग असेल. सिक्युर कम्युनिकेशनसाठी हे तंत्रज्ञान मिलिट्री फोर्सही करतं. मिलिट्री ग्रेड सिक्युरिटी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या स्मार्टफोनला महागड्या किंमतीमुळे रॉल्स रॉयसही म्हटले जाते. मात्र, या स्मार्टफोनचे नाव ‘सोलारिन’ आहे. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एक फिजिकल सिक्युरिटी स्विच बटन देण्यात आले आहे. यावर क्लिक केल्यानंतर सुपर सायबर सिक्योर मोडवर एनेबल होते. हे मोड विशेषत: एन्क्रिप्टेड कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी बनवले गेले आहे.

अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप बेस्ट कस्टम ओएसवर चालणा-या या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर आहे. २३.८ मेगापिक्सेल रिअर कॅमेराही देण्यात आला असून, ५.५ इंचाचा २K रिझॉल्युशन असणारे आयपीएस स्क्रीन देण्यात आले आहे. यामध्ये ४००० क्षमतेची बॅटरी असून, ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यामध्ये केवळ एका सिमचीच सुविधा असून, तीन पॉवरफुल स्पिकर्स देण्यात आले आहेत. पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर लावण्यात आले आहे.

Leave a Comment