बेकायदा मानवी तस्करी जगाचा चिंतेचा विषय

sex-robo
अ‍ॅमस्टरडॅम : जगाच्या दृष्टीने बेकायदा मानवी तस्करी चिंतेचा विषय बनला आहे. आज जगात संघटित गुन्हेगारीमध्ये तिस-या क्रमांकावर बेकायदा मानवी तस्करीचा समावेश केला जातो. या गुन्ह्याचा समाजमनावर आणि महिलांवर होणार परिणाम अत्यंत घातक आहे. विविध कायदे आणि उपाययोजना करूनही ही मानवी तस्करी नियंत्रणात आणता आलेली नाही. आता काही शास्त्रज्ञांनी रोबोट तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी तस्करी पूर्णपणे बंद करण्याचा चंग बांधला आहे.

रोबोटीक वारंगणा बनवून त्यांची वेश्यालये सुरू करावीत अशी कल्पना या तंत्रज्ञानात मांडण्यात आली आहे. ‘सेक्स रोबा’ या नावाने हे रोबोट विकसित करण्यात येत आहेत. या रोबोटीक वारंगणांशी शारीरिक संबंध ठेवता येतील सहाजिकच मानवी तस्करीच्या मुळावरच घाव घालता येईल असे या शास्त्रज्ञांना वाटते. अ‍ॅमस्टरडॅम येथे २०५० पर्यंत अशा प्रकारच्या रोबोटीक वारंगणा असलेले वेश्यालय सुरू होवू शकेल, असा अंदाज या शास्त्रज्ञांचा आहे.

‘रोबोटस, मेन अ‍ॅण्ड सेक्स टुरिझम’ नावाच्या रिसर्च पेपरमध्ये नामवंत फ्युचरॉलॉजिस्ट इआन योमान, युनिव्हर्सिटी ऑफ वेलिंग्टनचे सेक्सॉलॉजिस्ट मिचेल मार्स यांनी हा रिसर्च पेपर लिहिला आहे. रोबोटिक वारंगणाचा वापर केल्याने गुप्त रोगांची समस्या ही आटोक्यात येईल, असे मत या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. रोबोटिक वारांगणाचा वापर वेश्यालयात केला तर वारंगणा या व्यवसायातूनच बाहेर पडतील, त्यातून मानवी तस्करीचा काळा धंदा पूर्णपणे उखडला जाईल, असे या शास्त्रज्ञांचे मत आहे.

अनेक शास्त्रज्ञांना ही कल्पना रुचलेली नाही. मॅनफोर्ट युनिव्र्हसिटीच्या प्रा. कॅथलिन रिचर्डसन यांनी रोबोटस तंत्रज्ञानाचा असा वापर चुकीचा असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘रोबोटीक संशोधन क्षेत्रात सध्या सेक्स रोबोंच्या निर्मितीवर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले जात आहे. पण यातून स्त्री आणि पुरुषांतील नैसर्गिक नातेसंबंधावर काय परिणाम होतील याचा विचार होताना दिसत नाही. त्यामुळे या अशा प्रकारच्या रोबोंच्या निर्मितीवर वेळीच बंधन घालणे आवश्यक आहे.

Leave a Comment