मिठ्या मारण्याच्या विश्वविक्रमाची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद

world-record
नवी दिल्ली : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने एका भारतीयाच्या विश्वविक्रमाची नोंद घेतली आहे. एका मिनिटात सर्वाधिक मिठ्या मारण्याचा विक्रम हैदराबादमधील या व्यक्तीने केला आहे.

हल्ली विश्वविक्रमासाठी काहीही केले जाते, असे वाटू शकते. असेच काहीतरी हटके हैदराबादमधील एका व्यक्तीने केले आहे. एका मिनिटात तब्बल ७९ जणांना मिठ्या मारुन, हैदरबादमधील किशन कुमार या व्यक्तीने विश्वविक्रम केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. किशन कुमार यांनी एका मिनिटात ७९ जणांना मिठ्या मारुन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे.

Leave a Comment