‘नमोटेल’ने लाँच केला अवघ्या ९९ रुपयांचा स्मार्टफोन !

namotel
बंगळुरू – अच्छे दिन हे देशातील सर्वसामान्य लोकांना कधी येतील तेव्हा येतील, पण स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अच्छे दिवस आले असे म्हटले तर वावग ठरणार नाही. कारण स्वस्तात स्मार्टफोन ज्यांना खरीदी करायचा आहे. त्यांच्याकडे ९९ रुपये असणे पुरेसे आहे. आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बंगळुरुमधील नमोटेल डॉट कॉम या कंपनीने लाँच केला आहे. केवळ ९९ रुपयांमध्ये हा स्मार्टफोन कंपनीने बाजारात आणला आहे. ‘अच्छे दिन’ नावाने या स्मार्टफोनची ब्राडिंग केले जात आहे.

याबाबत माहिती देताना कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, १७ मे पासून फोनची अॅडवान्स बुकिंग सुरू करण्यात आली असून ती २५ मे पर्यंत असेल. जर तुम्ही हा स्वस्तातील स्मार्टफोन बुक करणार असाल तर कंपनीचे संकेतस्थळ namotel.com वर जाऊन फोनसाठी नोंदणी करू शकता.

अच्छे दिन स्मार्ट फोनमध्ये ४ इंचाचा स्क्रीन, अँड्रायड ५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टम, १ जीबी रॅम, इंटरनल मेमरी ४ जीबी आणि २ मेगापिक्सेलचा कॅमरा देण्यात आला आहे. हा फोन ड्यूअल सीम आणि ३जी सपोर्टेड आहे. भारतातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त हा स्मार्टफोन आहे. या फोनच्या खरीदीसाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यायही ग्राहकांना देण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ग्राहकांचा प्रतिसाद पाहून फोनच्या बुकिंगची तारीख वाढविण्यात येईल.

जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर पहिल्यांदा तुम्हाला bemybanker.com वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही namotel.com वर हा स्मार्टफोन खरेदी करू शकाल. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा १०० रुपये जमा करावे लागतील त्यानंतर तुम्हाला कंपनीची लाइफ टाइम सदस्यत्व मिळेल. कंपनीने या फोन निर्मितीच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ चा दावा केला आहे.

Leave a Comment