पंजाब नॅशनल बँकेला ५ हजार कोटींचा फटका

pnb
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेला बॅंकिंगच्या इतिहासात सर्वात‍ मोठा तोटा सहन करावा लागला असून बॅंकेला जानेवारी ते मार्च २०१६ या तिमाहीत तब्बल ५ हजार ३६७ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याच तिमाहीत मागील वर्षी बॅंकेला ३०६ कोटी रुपयांचा नफा झाला होता. बॅंकेला हा तोटा थकित कर्जांचे प्रमाण आवाक्याबाहेर गेल्यामुळे सहन करावा लागला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीची आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. त्यामध्ये बॅंकेला तोटा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या आर्थिक वर्षामध्ये चौथ्या तिमाहीत बॅंकेला ३०६.५६ कोटी रुपयांचा नफा झाला होता. सध्या बँकेच्या उत्पन्नामध्ये १.३३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचवेळी बॅंकेच्या थकित कर्जांमध्ये तीनपट वाढ झाली आहे.

Leave a Comment